रिक्षा चालकांना 2 लाखाचा विमा

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

मालवण (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेना यांच्या वतीने रिक्षा चालकांचा 2 लाखाचा विमा उतरविण्यात आला आहे. पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्रथम प्राधान्य यां तत्वावर विमा उतरवला जातं आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते रिक्षा चालकांना विमा वितरण करण्यात आले.

मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित कार्यक्रमात उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिल्हापरिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिडये यांसह नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रिक्षा चालक उपस्थित होते.