असलदे येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असलदे येथील स्वामी भवनमध्ये मोठ्या उत्साहात आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच परिसर भक्तिमय झाला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता काकड आरतीने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारच्या महाआरतीसाठी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने महाआरतीत सहभाग घेतला.
महाआरतीनंतर उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन लोके, संस्थापक खजिनदार सौ. ज्योती जाधव, विश्वस्त श्री. प्रकाश जोईल, श्री. प्रकाश पावसकर, सभासद सौ तन्वी शिंदे, श्री राजेंद्र पाताडे तसेच इतर मान्यवर आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.