खारेपाटण (संतोष पाटणकर) : Beautiful Tomorrow Foundation (BTF) च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त ११ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रम उत्साहात व दिमाखात पनवेल येथे माननीय उपायुक्त श्री दिलीप पवार (कौशल्य विकास व रोजगार विभाग,महाराष्ट्र शासन) यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.यावेळी पनवेल महानगर पालिकेचे महापौर नितीन पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील,उद्योजक संजय हावरे,रितू टंडन,सामाजिक कार्यकर्ते संजय सुर्यवंशी तसेच “सितारे जमीन पर” चित्रपटातील कलाकार आशिष पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात संजय सुर्यवंशी यांनी संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञतेपोटी कार्यक्रमाला निमंत्रित करुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक बुकेऐवजी दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या साबण,परफ्युम,मेणबत्त्या आदी वस्तूंनी करण्यात आले, ज्यामुळे आत्मनिर्भरतेचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.यावेळी “दिव्यान प्रकृती” या कोल्ड प्रेस्ड ऑइल युनिटचे उद्घाटन पनवेल च्या महापौरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या डॉ.स्वाती खाडे,डॉ.चेतना, स्मिता, सुवर्णा,मनीषा, डॉ.जया व संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
“दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”













