वायरी भूतनाथ येथे १९ रोजी शिवजयंती

मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव रविवार, १९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी १२.३० वाजता शिव पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. रात्री १०.३० वाजता मारुती सावंत यांच्या गुरुकृपा दशावतारी नाट्यमंडळ, हळवल कणकवली यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन प्रदीप वेंगुर्लेकर मित्रमंडळाने केले आहे.