Breaking News

श्री क्षेत्र रेडीत गणरायाचा ५० वा वर्धापन दिन आज साजरा

गाभाऱ्यातील आकर्षक फळांची आरास ठरली लक्षवेधी; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र रेडी येथील विघ्नहर्ता गणराया नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा गणपती बाप्पाचा ५० वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली आकर्षक फळांची आरास भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

या आरासीत विविध प्रकारच्या ताज्या फळांचा उपयोग करून गणरायाची देखणी सजावट साकारण्यात आली असून, त्यातून भक्तीभावासोबतच कलात्मकतेचीही अप्रतिम झलक पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून, परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

वर्धापन दिनानिमित्त पूजा, अभिषेक तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सोहळ्यामुळे रेडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.