सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२७-२०२८ या शैक्षणिक वर्षासाठी ६ वी च्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडा (दिल्ली) द्वारे प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती सहावीसाठी शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२७-२०२८ या शैक्षणिक वर्षासाठी ६ वी च्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडा (दिल्ली) द्वारे प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती सहावीसाठी https://navodaya.gov. in व https:/cbseitms.https://navodaya.gov. in व https:/cbseitms. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरत असताना पालकांची सही, विद्यार्थ्यांची सही, विद्यार्थ्याचा फोटो आवश्यक आहे. तसेच खुला प्रवर्ग सोडून, इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीचे प्रमाणपत्रसुद्धा जोडणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी इतर मागास प्रवर्गात येतात त्यांनी केंद्राचे फॉर्म ९ (क्रिमी लेअर) प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. तसेच रहिवासी प्रमाणपत्र हे सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले असावे. तसेच इयत्ता ३, ४, ५ वी शाळेचा यूडायस नंबर चेक करून ती शाळा ग्रामीण किंवा शहरी आहे, याची तपासणी करून ग्रामीण / शहरी विभाग निवडावा. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१/०७/२०२६ पर्यंत. असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा, असे प्राचार्य शशीकुमार के. व परीक्षाप्रमुख हेमंतकुमार जोंधळे (८०८०२२७३३०) व एस पी. हिरेमठ (७४४७६०६१४९) यांनी कळविले आहे.













