Breaking News

मुसळधार पावसात शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिराचे छप्पर कोसळले

बांदा (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस बांदा आणि परिसर परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसाचा मोठा फटका शेर्ले बाजारवाडी येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराला बसला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंदिराचे समोरील दर्शनी छप्पर अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, छप्पर कोसळल्याने मंदिराच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. बांदा परिसरातील संततधारेमुळे तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीला पूर आला आहे.