Breaking News

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती; असलदे येथे सत्कार समारंभाचे आयोजन

असलदे (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार श्री. वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल असलदे शाखेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सदर सत्कार समारंभ सोमवार, दि. ४ रोजी सायंकाळी ३.३० वाजता असलदे शाखा येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी, असे आवाहन शाखा प्रमुख श्री. संजय डगरे तसेच बूथ प्रमुख श्री. सचिन लोके यांनी केले आहे.
या निमित्ताने सर्व तमाम शिवसैनिकांनी एकत्र येऊन आपल्या नेत्याचा सन्मान करण्याची संधी साधावी, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.