काँग्रेसने त्यांच अस्तित्व गमावलाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन
नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित 131 वे संविधान सुधारणा विधेयक अपयशी ठरल्यानंतर हे महत्त्वाचे संबोधन आहे. 2 दिवस सतत चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मतदानात हे विधेयक पास होऊ शकले नाही.यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनाकडे देशाचे लक्ष लागले होते.
महिला विधेयकात सुधारणा होऊ शकली नाही. यासाठी मी सर्व महिलांची माफी मागतो. आमच्यासाठी देश हेच सर्वस्व आहे. पण काहींसाठी पक्ष मोठा असतो. काँग्रेस, डीएमसी, टीएमसी आणि समाजवादी दलांनी राजकारण केलं. नारी शक्ती विधेयक पाडलं तेव्हा हे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. त्यांनी केलं ते केवळ टेबलावरची थाप नव्हती तर महिलांच्या स्वाभीमान, आत्मसन्मानावर घाला होता. महिला आपला अपमान कधी विसरत नाहीत. प्रत्येक महिलेच्या मनात ही सल कायम राहील. देशातील महिला आपल्या क्षेत्रात या नेत्यांना पाहीलं, त्यावेळी तिला आठवेल, की याच लोकांनी महिला आरक्षण रोखल्याचा आनंद साजरा केला होता. महिला आरक्षणाला विरोध करुन पाप केल्याची शिक्षा विरोधकांना मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेस आणि त्यांच्या साथीदाकांनी देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भारतातील महिला शक्तीसमोर त्यांनी आपला खरा चेहरा आणलाय. आपला मुखवटा आणलाय. काँग्रेस आपल्या चुका सुधारेल, आपल्याला पापाचं प्रायश्चित करेल असे मला वाटले होते. पण त्यांनी विश्वास गमावल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेस आणि त्यांचे साथी डिलिमिटेशनबद्दल सारखे खोटे बोलतायत. यातून त्यांना विभाजन करायचंय. फोडा आणि राज्य करा, हे इंग्रजांकडून कॉंग्रेस शिकलीय. देशात काँग्रेसने आतापर्यंत फोडाफोडीचेच राजकारण केलंय, असे मोदी म्हणाले. सर्व राज्यांच्या जागा समान वाढतील, असे सांगितले होते. हे बील सर्व राज्यांसाठी मोठी संधी होती. हे बील पास झालं असतं तर सर्व राज्यांच्या जागा वाढल्या असत्या. पण यांनी आपल्या राज्यालाच धोका दिला. डीएमकेला तामिळनाडू, टीएमसीला बंगालला पुढे नेण्याची संधी होती. महिलाविरोधी ही प्रतिमा पुसण्याची समाजवादीला संधी होती. पण त्यांनी लोहीया यांच्या स्वप्नांना चिरडल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली.












