Breaking News

नांदगाव येथे भाजपच्यावतीने बाजारात जिलेबी तर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ; समाज हिताचे उपक्रम राबवत राहणार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री , खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजपा नांदगावच्यावतीने नांदगाव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आले. तसेच नांदगाव बाजारपेठ येथे बाजारपेठ मध्ये आलेल्या नागरिकांना जिलेबी वाटत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जि.प.समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सुरेश लोके, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, निरज मोरये,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, कमलेश पाटील, ऋषिकेश मोरजकर , आबा बिडये , नितेश म्हसकर, आदी उपस्थित होते.