जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण समिती सदस्यपदी निवड
खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण अशा दोन महत्वाच्या विषय समित्यांमध्ये निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजप व शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता असून अध्यक्ष,उपाध्यक्ष यांसह सर्व प्रमुख विषय समिती सभापतीच्या निवड देखील पार पडल्या असून नुकत्याच झालेल्या जि प. सदस्यांच्या सभेत सर्व विषय समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवार तथा खारेपाटण गावच्या माजी सरपंच सौ प्राची ईसवलकर यांची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण समिती मध्ये सदस्य म्हणून निवड झाली आहे.
भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर तसेच खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांसह खारेपाटण विभागातील प्रमुख पदाधिकारी यांनी सौ प्राची ईसवलकर यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












