क्रशर प्लांटमुळे घरांना तडे; तोंडवली बोभाटेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

नांदगाव (प्रतिनिधी) : तोंडवली बोभाटेवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या क्रशर प्लांटमुळे परीसरातील घरांना तडे व धूळ पसरत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनास व सबंधित ठेकेदार कंपनीस पत्रव्यवहार करून क्रशर बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या २५ मार्चच्या निवेदनानुसार कायदेशीर चौकशी करून क्रशर कायमस्वरूपी बंद करणे व ग्रामस्थांचे आतापर्यंत झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळण्यासाठी बुधवार सकाळी तोंडवली बोभाटेवाडी व ग्रामस्थ क्रशरच्या प्लांट समोर आमरण उपोषण सुरू केले.

या उपोषणास यशवंत सदडेकर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, ग्रा. पं. सदस्य रविंद्र बोभाटे, मनश्री कांडर, तात्या निकम, संतोष मिराशी, प्रकाश मेस्त्री, उध्दव बोभाटे, सिताराम मेस्त्री, अमित सदडेकर, विशाल मेस्त्री, मनोहर पटेल, प्रकाश बोभाटे, बाळा बोभाटे, महेंद्र सदडेकर, अभिजित बोभाटे, दिगंबर साळुंखे, मनीष बोभाटे, अनिल बोभाटे, सुनिल मोरये, मंगेश बोभाटे, समीर बोभाटे, प्रविण मोरये, तुकाराम मोरये, आदी उपोषणकर्ते उपस्थित होते.