तळेरे एस टी बस स्थानकला कार्यालयीन कपाट भेट
खारेपाटण ( संतोष पाटणकर ) : कोकिसरे ता. वैभववाडी गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कणकवली कणकवली आगाराचे सेवा निवृत्त माजी वाहतूक निरीक्षक श्री अशोक उर्फ बी एल जाधव यांनी आपल्या दिवंगत आई मायावती व श्री लक्ष्मण आणि भाऊ श्री रवींद्र जाधव यांच्या स्मरणार्थ नुकतेच तळेरे एस टी बसस्थानकला
एक मोठे कार्यालयीन कपाट भेट म्हणून दिले.
श्री बी एल जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दि.१४ एप्रिल २०२६ रोजी हे कपाट तळेरे एस टी बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री अविनाश दळवी यांचेकडे सुपूर्द केले.यावेळी कणकवली आगाराचे स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम,माजी वाहतूक नियंत्रक श्री अरुण भांबुरे,बुरंबावडे गावचे माजी सरपंच श्री रवींद्र शिंगे,तळेरे बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री अविनाश दळवी,सुशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यालयीन कपाट बुरंबावडे गावचे माजी सरपंच श्री रवींद शिंगे यांच्या शुभहस्ते तळेरे बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री अविनाश दळवी यांचे कडे सुपूर्द करण्यात आले.तळेरे एस टी बस स्थानकाला अत्यावश्यक असणारे कार्यालयीन कपाट श्री बी एल जाधव यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचे तळेरे ग्रामस्थ व एस टी महामंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.












