रेडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध द्विभुजा गणपतीचा ५० वा वाढदिवस समारंभ १८ एप्रिल रोजी धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. मंदिरात पहाटे ६ वा. अभिषेक, ८ वा. श्री सत्यविनायक महापुजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, १२.४५ वा. तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ५ वा. पर्यत महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ८ वा. पर्यत स्थानिक भजने, सायंकाळी ५ वा. श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत ‘स्वर गणेश’ कार्यक्रम, रात्री ८ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट, रेडी व श्री गजानन देवस्थान, रेडी नागोळेवाडी यांनी केले आहे.












