कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कणकवली येथील बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे काम पूर्ण झाले असून,त्याची पाहणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.
कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या मागणीनुसार नगरपंचायतीमार्फत समाजकल्याण निधीतून या प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे २३ लाख रुपयांचा निधी खर्च करून हे काम पूर्णत्वास नेण्यात आले.
या पाहणीवेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह नगरसेवक लोकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, सुदीप कांबळे, सुजित जाधव, कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव संजय कदम, अध्यक्ष अंकुश कदम तसेच इतर पदाधिकारी व कार्यकारी सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी या प्रसाधनगृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती संघाचे सचिव संजय कदम यांनी दिली.












