खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे पक्ष खारेपाटण विभाग व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय येथे नुकतेच भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर कार्यक्रम जि. प. सदस्य प्राची ईसवलकर व पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, भाजपा पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजीं सरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूल प्राचार्य संजय सानप, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, खारेपाटण ग्रा.पं सदस्य मनाली होणाळे, दक्षता सुतार, सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, संस्थेचे संचालक प्रशांत गुळेकर, युवा कार्यकर्ते तेजस राऊत, सुहास राऊत, माजी ग्रा. पं. सदस्य योगेश पाटणकर, रोटरी सदस्य अजय गुरसाळे, संतोष राऊत, पप्पू रायबागकर, सिंधू मित्र रक्त प्रतिष्ठान चे कार्यकर्ते दादा जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवसेना विभाग खारेपाटण यांच्या वतीने नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला अथायू हॉस्पिटल कोल्हापूर येथील डॉक्टर व कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. तर रक्तदान शिबिराकरिता सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले या सर्वांचे आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी संघर्षमय राजकीय कारकिर्दीचा उहापोह केला. यावेळी प्राची ईसवलकर, संजय सानप, प्रवीण लोकरे, गुरुप्रसाद शिंदे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या आरोग्य शिबिराला नागरिकाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षणं प्रसारक मंडळ संचलित श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे यांनी केले. तर सर्वांचे आभार मंगेश गुरव यांनी मानले.













