कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रसह अनेक राज्यात मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिध्द असणारा व भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार, ३ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ पर्यंत नवीन नवस बोलणे, सायं. ४ ते ८ पर्यंत मटण भिकारी महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या जत्रेच्या तयारीला सुरवात झाली असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.












