३० लाखांच्या विकासकामाला सुरुवात
कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक २५ मार्च २०२६ रोजी तोंडवली बावशी ग्रामपंचायत हद्दीतील बावशी गावठण येथे महावितरणच्या आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत ११ केवी मेन लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे ३० लाख रुपयांच्या निधीतून हे महत्त्वाचे वीजविषयक विकासकाम हाती घेण्यात आले असून, या कामामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमासाठी मा. सरपंच सौ. मनाली गुरव, मा. उपसरपंच श्री. दिनेश कांडर, ग्रामपंचायत सदस्य सौ. मनश्री कांडर तसेच श्री. हेमंत कांडर, श्री. विलास कांडर, श्री. संजय नाडकर्णी, श्री. दीपक कांडर, श्री. सचिन सावंत आणि श्री. बाळकृष्ण जाधव यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.













