दोन्ही गाड्यांची हानी; टेम्पो चालक पळून गेल्याने संताप
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली घाटात दाणोळी जवळ एसटी आणि टेम्पोची धडक बसली. यात अपघात होऊन गाड्यांची हानी झाली. गडहिंग्लज मार्गे सावंतवाडी एसटीचा यात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, टेम्पो चालक न थांबताच पळून गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी उपस्थितांनी प्रवाशांना मदतीसाठी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल झालेत.












