मसुरे (प्रतिनिधी) : नवतरुण मित्रमंडळ, डांगमोडे व ग्रामस्थ आयोजित जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यातून मसुरे-डांगमोडे येथील देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त १३ मार्च रोजी मसुरे डांगमोडेतील रवळनाथ मंदिरानजीकच्या मैदानावर जिल्हा पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन सायं. पाच वा. केले आहे.
विजेत्या संघाला १० हजार रु., चषक, उपविजेत्या संघाला ६०००, चषक, तृतीय २०००, चतुर्थ २००० व प्रथम, द्वितीय क्रमांकाला शिवाजी ठाकुर स्मृती चषक, बेस्ट रायडर, डिफेंडर, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांना रोख रु., स्मृती चषक देण्यात येईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धा सायं. पाच वा. सुरु होईल. सर्व खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था आहे. संघांनी नावे नितीन हडकर ७२४९३५७२३९, दत्तप्रसाद पेडणेकर, मसुरेकडे नोंदवावीत.












