Breaking News

‘मुडेश्वर’ परिसरातील आरक्षण रद्द करा

जमीन मालकांची मागणी; दुर्लक्ष केल्यास उपोषण छेडण्याचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : शेखर राणे म्हणाले की, नगरपंचायतीची स्थापना होण्यापूर्वी मुडेश्वर मैदान हा परिसर औद्योगिक झोन म्हणून निश्चित झाला होता. हा झोन पंचवीस वर्षे कायम होता. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर येथील ११४० गुंठे क्षेत्रात स्टेडियमसाठी आरक्षण निश्चित केले. मात्र, मागील पंचवीस वर्षांत हीजागा नगरपंचायतीला ताब्यात घेता आली नाही. आता शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये येथील जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी आरक्षण निश्चित केले. त्यामुळे सन २०४६ पर्यंत ही जागा पुन्हा आरक्षित झाली आहे. वर्षांनुवर्षे ही जागा आरक्षित ठेवलीजात आहे. ही जागा नगरपंचायत ताब्यात घेत नाही, तसेच स्थानिकांनाहीविकसित करता येत नाही. त्यामुळे आता या जागेवरील आरक्षण रद्द व्हायला हवे.