कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक शनिवार, ०७ मार्चला सकाळी ११ वा. कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेचे सर्व आजी-आजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.












