तिघेही विजापूरी समुदायातील
देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतींसह एक युवक बेपत्ता झाल्याच्या स्वतंत्र तक्रारी देवगड पोलिस स्थानकात संबंधितांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. हे तिघेही विजापूरी समुदायातील असून ते २५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ ते ८.३० या कालावधीपासून बेपत्ता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जामसंडे वळकूवाडी येथील अमोल सावळा मानवर (१८ वर्षे ८ महिने) हा २५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता कोणाला काहीही न सांगता बजाज पल्सर या दुचाकीने घरातून निघून गेला. त्याची शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील सावळा शिवा मानवर (४२) जामसंडे वळकूवाडी यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. या घटनेचा तपास महिला पोलिस नाईक भक्ती चोपडेकर करीत आहेत.
दुसèया घटनेत जामसंडे वळकूवाडी येथील अर्चना बबन मानवर ( १८ वर्षे ८ महिने) ही २५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजता कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला मात्र तिचा शोध न लागल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार अक्षय बबन मानवर (२६) रा. जामसंडे शांतीनगर याने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रविण सावंत करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत जामसंडे येथील मनिषा सर्जेराव माने (१८व र्षे १० महिने) ही युवती २५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजता कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला मात्र तिचा शोध न लागल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार गोकूळा सर्जेराव माने (५०) रा. जामसंडे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. या घटनेचा तपास महिला पोलिस हवालदार विनीता भुजे करीत आहेत.












