नाटळ येथे संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; वक्तृत्व स्पर्धा व ‘स्वरझंकार’ ऑर्केस्ट्राचा जल्लोष

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होम मिनिस्टर खेळ रमाईच्या पैठणीचा

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ बौद्ध विकास संघ, नाटळ शाखा मुंबई (नोंदणीकृत) यांच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दि. ३० एप्रिल ते १ मे २०२६ दरम्यान भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ठीक ११.०० वाजता विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये गट क्रमांक ०१ (पहिली ते चौथी) साठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण’, गट क्रमांक ०२ (पाचवी ते सातवी) साठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार’ आणि गट क्रमांक ०३ (आठवी ते दहावी) साठी ‘माझे प्रेरणास्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. सायंकाळी ‘होम मिनिस्टर’ अर्थात ‘पैठणी रमाईची’ हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी ‘युथ क्रिएशन नाटळ प्रस्तुत’ ऑर्केस्ट्रा स्वरझंकार सादर होणार असून, यामुळे वातावरणात सांस्कृतिक जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आयु. चंद्रकांत तांबे (९४२०२१०८९४ / ९६९९४२६०२५) तसेच प्रीतम तांबे (९३२२०११७०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.