कोकणातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी — साईजळवी फिल्मचा अभिनय शिबीर

कुडाळ (प्रतिनिधी) : कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना सिने–मालिका क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी साईजळवी फिल्म यांच्या वतीने विशेष अभिनय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १२ वर्षांपासून हजारो कलाकारांना संधी देणाऱ्या या संस्थेमार्फत हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

हे शिबिर रविवार, दि. ३ मे ते शनिवार, दि. ९ मे २०२६ या कालावधीत (एकूण ७ दिवस) दररोज सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सिने–मालिका क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जाणार असून, सहभागी कलाकारांमधून निवडक कलाकारांना आगामी चित्रपटांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या शिबिरात सुप्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे तसेच लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश शिरसाठ हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे संयोजक साईनाथ जळवी हे दिग्दर्शक आणि फिल्म लाईन प्रोड्युसर असून कोकण कला केंद्राचे अध्यक्षही आहेत.

८ वर्षांवरील इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक ७५०६४१९७६६ असा आहे. हे शिबिर हॉटेल स्पाईस कोकण, बजाज शोरूमच्या बाजूला, मुंबई–गोवा महामार्ग, कुडाळ येथे पार पडणार आहे.