Breaking News

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी संजय गवस यांनी घेतली सदिच्छा भेट !

शिवसैनिकांत नवचैतन्य

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी मुंबईत ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचे स्वागत केले.

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या संजय गवस यांनी या भेटीनंतर नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांना त्यांच्या “राजकीय मंदिरा”त नतमस्तक होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत पक्षसंघटना वाढीसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर ठाकरे यांना पुष्पगुच्छ देण्याचा योग आल्याने ही भेट विशेष ठरल्याचे गवस यांनी नमूद केले.

“आम्ही अनेक वेळा मातोश्रीवर गेलो आहोत, मात्र कालची भेट कायम स्मरणात राहील. महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ‘मातोश्री’चे नाव माध्यमांमध्ये येत नाही. आमच्यासाठी हे ठिकाण खऱ्या अर्थाने राजकीय मंदिरच आहे,” असेही त्यांनी सांगितले.

कोकणातील शिवसैनिक कडवट व निष्ठावंत असल्याचा उल्लेख करत, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार गवस यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना सचिव व माजी खासदार
विनायक राऊत यांची प्रमुख उपास्थिती होती. तर गवस यांचेसमवेत त्यांचे सहकारी भिवा गवस, विजय जाधव सुद्धा उपस्थित होते.