कणकवली (प्रतिनिधी) : पुणे येथील कैलाश देह हे आपल्या ताब्यातील सियाज कारमधून पत्नी आणि मुलासह गोवा येथे पर्यटनाला जात असताना हुंबरठ तिठा येथील ब्रिजवर मारुती सियाझ कारचा अपघात घडला. घटनास्थळी देह यांच्या म्हणण्यानुसार सियाज कारला एका ट्रकची धडक बसली. कार चा पुढील टायर फुटून डाव्या बाजूने कार पूर्ण घासली होती. अपघातानंतर भांबावलेल्या अवस्थेत कैलास देह याना पुढील काही आठवत नव्हते. घटनास्थळी हायवे ट्राफिक पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड, हवालदार ठाकूर व सहकाऱ्यांनी पोचत रस्त्याच्या मध्ये असलेली कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.












