Breaking News

बावशी येथे विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आज दिनांक २ मे २०२६ रोजी बावशी गावात विविध रस्ते विकास कामांच्या वचनपूर्ती अंतर्गत भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यामध्ये बावशी मुख्य रस्ता ते जळकेवाडी खडीकरण व डांबरीकरण, बावशी मुख्य रस्ता गुरव घर ते बौद्धवाडी रस्ता, बावशी मुख्य रस्ता ते आई पावणादेवी मंदिर रस्ता, फौजदार घर ते राणे घर रस्ता तसेच बावशी मुख्य रस्ता ते तेली घर रस्ता या विविध मार्गांच्या कामांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. संतोषजी पारकर (जिल्हा परिषद सदस्य, कासार्डे), मा. श्री. संजयजी देसाई (माजी जिल्हा परिषद सदस्य), मा. श्री. पंढरी वायगणकर, श्री. प्रमोद शेटये, श्री. प्रल्हाद कुडतरकर, श्री. हेमंत कांडर उपस्थित होते.
तसेच उपसरपंच श्री. दिनेश कांडर, ग्रामपंचायत सदस्या सौ. मनश्री कांडर, सौ. सुप्रिया खडपे, श्री. विलास कांडर, श्री. जयेश राणे, श्री. भरत कांडर, श्री. दिनानाथ कांडर, श्री. योगेश गुरव, तात्या तेली, वासू तेली, अशोक कदम यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे गावातील दळणवळण सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी अशा प्रकारची कामे पुढेही राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.