झाडाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरवडे येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. निरवडे येथील एका ठिकाणी संबंधित कामगाराचा मृतदेह झाडाला लटकत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तपास सुरू आहे. मृतदेह ज्या संशयास्पद अवस्थेत सापडला आहे, त्यावरून ही आत्महत्या आहे की घातपात ? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.