कणकवली येथे ३० रोजी बुद्धिबळ स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : चेतना ट्रेडर्स कट्टाच्यावतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार, ३० एप्रिल रोजी लक्ष्मी विष्णू हॉल, कॉलेज रोड, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यास रोख रक्कम रु. ३००० व चषक, उपविजेत्यास रोख रक्कम रु. २००० व चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम रु. १००० व चषक, चौथा व पाचवा क्रमांक रोख रक्कम रु. ७५० तसेच सहा ते दहा क्रमांकापर्यंत रोख रक्कम रु. ५०० देऊन गौरविण्यात येणार आहे. लहान मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ९, ११, १३ १५ वर्षांखालील गटांनाही चषक व पदक देण्यात येईल. स्पर्धा सकाळी १० वाजता सुरू होईल. नाव नोंदणीसाठी ९४२२३८१९४९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक प्रसाद साळकर यांनी केले आहे.