Breaking News

पोकलँड मशीन जाळले; २० लाखांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : विलवडे येथे सुरू असलेल्या एका दगडाच्या खाणीत उभे असलेले पोकलँड मशीन काल रात्री अज्ञातांनी जाळून खाक केले. ही खाण गौरव काणेकर यांच्या मालकीची असून, या आगीत मशीनचे सुमारे २० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर प्रकारानंतर काणेकर यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची आणि मशिनरी जाळण्याची धमकी देण्यात आली होती. या संदर्भातील महत्त्वाची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे उपलब्ध असून, ती आपण पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास बांदा पोलीस करणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अधिक तपास हवालदार श्री तेली करत आहे.