Breaking News

महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र सुरूच; टीईटी परीक्षा रद्द

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. उद्या रविवारी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलत उद्या होणारी ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ही परीक्षा कधी होणार ? याची वाट पाहावी लागणार असल्याने परीक्षार्थीमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.