Breaking News

उत्तम धाकु वंजारे यांना सहाय्यक पोलीस फौजदार पदी बढती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलातील आचरा पोलिस स्टेशनचे हवालदार व बेळणे आउट पोस्टचे इनचार्ज उत्तम धाकु वंजारे यांना नुकताच सहाय्यक पोलीस फौजदार (ए. एस. आय.) पदी बढती मिळाली. सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे हस्ते, एका कार्यक्रमात वंजारे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नरडवे तालुका कणकवली येथील शेतकरी कुटुंबातील उत्तम वंजारे हे १ जानेवारी १९९६ रोजी पोलिस भरतीने सेवेत रुजु झाले. सावंतवाडी मुख्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नोकरीस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली आणि सध्या कार्यरत असलेले पोलीस स्टेशन आचरा येथे अतिशय उत्कृष्ट व स्वच्छपणे आपली नोकरी सांभाळत समोरच्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना योग्य मान सन्मान देत त्यांनी, आपले सेवाकार्य बजावले. ३० वर्षाच्या प्रामाणिक व निस्वार्थ पोलीस सेवेचे फळ, प्रमोशन रूपाने मिळून, महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाने, उत्तम वंजारे यांना सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर बढती दिली. सदर नियुक्ती पत्र पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वंजारे यांना प्रदान केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.