वैभववाडी(प्रतिनिधी) : नाधवडे गावातील पावन भूमीवर वसलेल्या प्राचीन व जागृत श्री ठाणेश्वर देवस्थान, या मंदिराचा भुमिपुजन सोहळा उद्या २८फेब्रु. होत आहे. या निमित्ताने पवित्र भूमिपूजन विधीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळी ठीक ९.०० वाजता देवस्थान परिसरात हा शुभारंभसोहळा पार पडणार आहे. या मंगल प्रसंगी ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देवस्थानाच्या जिर्णोद्धारामुळे मंदिराचा प्राचीन वैभवाला पुन्हा उजाळा मिळणार असून परिसराचे सौंदर्य आणि सुविधा अधिक वृद्धिंगत होणार आहेत. या कार्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असून सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन बारा पाच माणकरी आणि समस्त इस्वलकर परिवार यांनी केले आहे.












