वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पोलिसांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे एक वर्षांपूर्वीच्या सराईत गुन्हेगाराला सांगोला येथून अटक करण्यात त्यांना यश आले आहे एप्रिल 2025 मध्ये नापणे येथील वयोवृद्ध पुरुषत्तम नरहरी प्रभूलकर यांच्याकडे पाणी पिण्याच्या बहाण्याने जाऊन मारहाण करून गळ्यातील चैन चोरुन गुलाम उर्फ कैवली आबास वय 40 हा फरार झाला होता या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वैभववाडी तालुक्यात भीतीचे वातावरण झाले होते. पोलिस तपास करताना कोणतेही ठोस पुरावे नव्हते गेले वर्षभर पोलिनी वेगवेगळ्या पदधतीने तपास यंत्रणा राबवून तपास करण्याचा प्रयन्त केला अनेक विविध ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीना ताब्यात घेत चौकशी केली मात्र पोलिसांना यश मिळाले नाही मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि फिर्यादी पुरुषत्तम प्रभुलकर यांचे पुत्र संदीप प्रभुलकर यांनी सतत तपासासाठी पोलिसाकडे केलेला पाठपुरावा यामुळे या घटनेचा तपास करणे पोलिसासमोर मोठे आव्हान होते वैभववाडी पोलिसांनी तपासात सातत्या ठेऊन एकवर्षानी यश मिळाले
आहे आरोपी याने गुन्हा कबूल केला असून दीड तोळे सोन्याची चैन बाजारात विकली त्यातील पैसेही खर्च झाले पैकी त्याच्या आईने 20 हजार रुपये पोलिसांना परत केले आहेत गुलाब आबास हा सरईत गुन्हेगार असून गेली अनेक वर्ष गोवा, कर्नाटक, कोल्हापूर सिंधुदुर्ग, कोल्हापूर अश्या अनेक ठिकाणी अनेक चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
या घटनेचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते परंतु वैभववाडी पोलिसांनी प्रथम दर्शनी कोणतेही पुरावे नसताना धागेद्वारे किंवा ठोस पुरावे नसतानाही आरोपीला शोधून काढण्यात यश मिळवले आहे.
आरोपीने गुन्हा कबूल केला असून सोन्याची चैन विकून पैसे संपवल्याचे मान्य केले मात्र त्यातील वीस हजार रुपये त्याच्या आईने परत केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.












