कणकवली (प्रतिनिधी) : महिला अत्याचार निवारणकक्षामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या निकिता बाळकृष्ण एडवे यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.
निकिता एडवे शासनाच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. एडवे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पोलिस ठाण्यात यशस्वी सेवा बजावली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक यांची पदे पोलिस उपनिरीक्षक संवर्गामध्ये वर्ग करण्यात आली असून त्यांना पोलिस उपनिरीक्षक संबोधण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता पोलिस दलात ३० वर्षे सेवा, सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर ३ वर्षे सेवा असे निकष होते. या अंतर्गत निकिता एडवे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे.













