फोंडाघाट मधील भुसारी दुकानदार चंद्रकांत फोंडके यांची प्राणज्योत मालावली
कणकवली (प्रतिनिधी) : दुपारी सव्वा बारा वाजता तळेरे दळवी कॉलेजसमोरील शिडवणे फाट्यावर भरधाव मारुती सेलिरिओ कार ची होंडा ऍक्टिव्हा दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात फोंडाघाट बाजारपेठ मधील भुसारी दुकानदार चंद्रकांत कृष्णाजी फोंडके हे गंभीर जखमी झाले. फोंडके यांना कणकवलीत वैद्यकीय उपचारासाठी दाखल करत असतानाच प्रवासादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.चंद्रकांत फोंडके हे आपल्या भुसारी मालाच्या वसुली कामासाठी सकाळी तळेरे, खारेपाटण भागात गेले होते.तिथून परत फोंडाघाट च्या दिशेने येत असताना हा अपघात घडला.बेळगाव येथील कारचालक हेमंत रेमानसे हे आपल्या बेळगावहून गणपतीपुळे येथे आपला मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांसह देवदर्शनाला गेले होते. गणपतीपुळे हुन बेळगावच्या दिशेने जात असताना तळेरे दळवी कॉलेज समोर हा अपघात घडला. अपघात स्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पन्हाळे, हवालदार मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल तांबे यांनी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला.













