देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसीलदार कार्यालय येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) 22 वा हप्ता वितरण ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी गणेश राणे (सभापती) पंचायत समिती देवगड, अमोल लोके (उपसभापती) पं.स. देवगड,. अजितराव गोगटे (माजी आमदार), विवेक शेठ (निवासी नायब तहसीलदार ) देवगड, श्रीम. आरती पाटील (तालुका कृषी अधिकारी) देवगड, श्रीम. मानसी पवार (कृषी अधिकारी) देवगड शेतकरी उपस्थित होते.
उपस्थितांचे सत्कार झालेनंतर आरती पाटील यांनी प्रास्ताविकात PM-KISAN योजनेचे सविस्तर स्वरूप सांगितले तसेच काही शेतकरी वंचित असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन केले.. गणेश राणे (सभापती) जास्तीत जास्त शेतकरी यांनी PM-KISAN योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभागचे यावेळी आभार मानण्यात आले.












