कणकवली (प्रतिनिधी) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ राहणारे देवाशीष सुनील कोरगावकर यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
देवाशीष कोरगावकर यांनी आपली एमएच ०७ एटी २२०७या क्रमांकाची दुचाकी २८ फेब्रुवारी रोजी राहत्या घरासमोर पार्क केली होती. मात्र, १ मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही.
कणकवली शहर परिसरात सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नसल्याने अखेर आपली दुचाकी चोरीला गेल्याची खात्री पटताच कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या चोरीबाबत देवाशीष कोरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.












