पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय

वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैभववाडी ( प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशानंतर संपूर्ण राज्यभर पक्षात आनंदाचे वातावरण आहे. वैभववाडी तालुक्यात देखील भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाबद्दल जल्लोष केला. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, नासीर काझी, उपसभापती साची कोलते, महिला अध्यक्ष प्राची तावडे, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, महेश संसारे, सुवर्णा संसारे, प्रदीप रावराणे, आशिष रावराणे, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.