Breaking News

कणकवलीत ९ मे रोजी ‘महाराणा प्रतापसिंह जयंती’ उत्सवाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली (प्रतिनिधी) : वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी कणकवली येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह (राणे समाज) उत्सव समिती’च्यावतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
या उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता दुचाकी रॅलीने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता पुजाविधी होतील .उपस्थिताना तीर्थप्रसाद वाटप करण्यात येईल. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ८ वाजता कणकवली बांधकरवाडी येथील दत्तप्रसादिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन होईल. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री ९ वाजता होणारा ‘कालिका महात्म्य’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होय . सिंधुरत्न महिला दशावतार मंडळ सादर करत असलेल्या या प्रयोगात ज्येष्ठ टीव्ही अभिनेत्री अक्षता कांबळी विशेष भूमिकेत दिसणार आहेत.
कणकवली येथील श्री रवळनाथ मंदिर शेजारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.