कासार्डे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मा. प्रमोद सुनीता शांताराम जठार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 नंतर हा कार्यक्रम पार पडणार असून, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जठार यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून संघर्षमय प्रवास करत, कोकणातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि विविध विकास प्रकल्प उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या निमित्ताने रात्री संगीतासह भोजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












