कणकवली (प्रतिनिधी) : नाथ पै नगर, प्रभाग क्र. 15 येथे आज निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. ज्येष्ठ नेते सतीश सावंत यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, तसेच प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला सतीश सावंत, सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, राजू शेट्ये, सुशील आळवे, योगेश मुंज, अजित काणेकर, मंगेश राणे, रिमेश चव्हाण, चेतन वालावलकर, चेतन मुंज, अमित राणे, संदेश मयेकर, राजन महाडगूत, समीर पावसकर, बंड्या राणे, महेंद्र नाईक, संदेश जाधव, बाळा कुडतरकर, समीर सावंत, बाबू जाधव, गुरु मोर्ये, कमलेश नारकर, संकेत कुडतरकर आदींचीही उपस्थिती होती.
प्रचाराच्या शुभारंभावेळी उपस्थित मान्यवरांनी एकजुटीने काम करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला. परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.












