ओझरम प्रीमियर लीग 2026 : क्रिकेटप्रेमींसाठी थरारक जल्लोष 11-12 एप्रिलला

तळेरे (स्वप्नील तांबे) : ओझरम प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींसाठी रंगतदार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १२ एप्रिल रोजी ओझरम ग्रीन पार्क मैदान येथे ही स्पर्धा पार पडणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत ओझरम, दारूम, नाद, शिरवली, ओंबळ, वाघिवरे, वेळंगवे आणि गवाणे या पंचक्रोशीतील संघांचा सहभाग असणार आहे. स्थानिक खेळाडूंना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून प्रेक्षकांसाठी दोन दिवस रोमांचक सामने अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींना एकत्र येऊन खेळाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. “या! खेळाचा आनंद घ्या!” असा संदेश देत स्पर्धा अधिक रंगतदार करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.