असलदे बौद्धवाडी च्या सुपुत्राची महाराष्ट्र हॉकी संघात निवड

पुणे (प्रतिनिधी) : हॉकी इंडिया सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा साठी महाराष्ट्राच्या संघाच्या नेतृत्वाची धुरा सांगलीच्या सार्थ शिंदे याच्याकडे सोपविण्यात आली आहे. राजगीर येथे १ एप्रिलपासून सुरू झालेली ही स्पर्धा १२ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघात मुंबईचे सात, सांगलीचे तीन, पुणे व नांदेडचे प्रत्येकी दोन, तर नाशिक, कोल्हापूर, जळगाव आणि नागपूर येथील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा ‘अ’ गटात समावेश असून या गटात पंजाब आणि चंदीगड संघांचाही समावेश आहे.
महाराष्ट्राची पहिली लढत पंजाबविरुद्ध ५ एप्रिलला, तर चंदीगडविरुद्ध ६ एप्रिलला होणार आहे.
महाराष्ट्र संघ :
प्रथमपटियाल, अधिराज सिंग (पुणे), ज्ञानेशकुमार, फौआद शेख, रॉयडेन कोली, प्रियांशू विचारे, आमोद घाडगे, वेदान्त तांबे, चिंगशुबम हेथोइबा (मुंबई), बलप्रीतसिंग लोणीवाले, योगेश मोसोळीकर (नांदेड), सार्थ शिंदे (कर्णधार), सुजल दळवी, शिवराज पाटील (सांगली), विलास केदार (नाशिक), ओम पाटील (कोल्हापूर), रेहान खान (जळगाव), यश बामणेल (नागपूर).
प्रशिक्षक : गिरीश पिंपळे, राकेश सुखदेवे
व्यवस्थापक : कॉनरॉय रेमेडिओस