विनापरवाना उत्खनननावर तहसीलदारांची कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : विनापरवाना माती उत्खननावर कोटकामते येथे देवगड तहसीलदार यांच्या कडून धडक कारवाई करण्यात आली. देवगड कोटकामते येथील परिसरात विनापरवन सुरू असलेल्या अवैध मृदा (माती) उत्खननाविरोधात ग्रामस्थ व कोटकामते ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत देवगड तहसीलदार यांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान उत्खनन होत असलेल्या ठिकाणी यावेळी एमएच-07 AJ 8888 क्रमांकाचा माती वाहतूक करणाऱ्या डंपरावर कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी देवगड तहसीलदार यांच्या निर्देशानुसार यावेळी पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पावसकर तसेच खुडी येथील तलाठी वंजारे मृदा माती उत्खनन होत असलेल्या ठिकाणी उपस्थित होते यांनी या ठिकाणचा पंचनामा केला.

त्याच प्रमाणे त्या ठिकाणी झालेल्या खोदकामाचे मोजमाप घेऊन आणि उत्खननासाठी वापरण्यात आलेली विविध हत्यारे यांची नोंद घेतली. सदर पंचनामा व अहवाल पुढील कार्यवाहीसाठी देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावेळी या उत्खननाची ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत देवगड तहसीलदार यांनी तात्काळ हालचाल करत छापा टाकून माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध माती उत्खननकरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या अवैध उत्खननावर कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यावेळी गावचे उपसरपंच गणेश (दाजी) घाडी, माजी उपसरपंच विजय केशव कुडपकर तसेच ग्रामस्थ भालचंद्र (भाई) मेस्त्री उपस्थित होते. गाव परिसरात विनापरवाना मृदा उत्खनन सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.