बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला.

त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित रो-रो सेवा जनतेच्या सेवेत दाखल झाली आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १ मार्चला सकाळी ८ वाजता भाऊचा धक्का, मुंबई येथून पहिली रो-रो विजयदुर्गकडे मार्गस्थ झाली आहे. या महत्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांचे आभार मानायला हवेत.