सारस्वत ज्ञातीतील बटूंच्या उपनयन विधीसाठी आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गतर्फे सारस्वत ज्ञातीतील बटूंचा उपनयन संस्कार विधी गुरुवार, ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम माणगाव येथील दत्त मंदिरनजीक यक्षिणी मंदिरच्या बाजूला वेद पाठशाळा भवनमधील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. सारस्वत ज्ञातीतील बटूंच्या पालकांनी आपल्या बटूंची नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे, या मुंजींचा मुहूर्त १२.२९ चा असून संस्थेच्या परंपरेनुसार विधीवत कार्यक्रम करण्यात येणार आहेत. धर्म संस्कार व परंपरा जतनासाठी हा विधी आवश्यक आहे. लागणारे साहित्य, पुरोहित, भोजन व अन्य आवश्यक बाबींची सोय संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या बटूंची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी राजस रेगे (९४२२३७९१२३), दत्ताराम पाडगावकर, वैभव केंकरे यांच्याकडे २५ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.