कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा शिवसेनेचे लढवय्या, झुंजार नेते, माजी आमदार (जीजी) परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन कणकवली शहरातील तेली आळी येथे आज सोमवार, १२ एप्रिलला रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. हे आयोजन तेली आळी मित्रमंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
हा डबलबारी सामना श्री वडचीदेवी प्रासादीक भजन मंडळ, लिंगडाळ – देवगडचे बुवा संदीप लोके विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे – कुडाळचे बुवा गुंडू सावंत असा होणार आहे. लोके बुवा यांना पखवाज साथ योगेश सामंत व तबला साथ संदेश सुतार तर सावंत बुवा यांना पखवाज साथ विराज बावकर व तबला साथ संकेत गोसावी करणार आहेत. रसिकांनी डबलबारी भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेली आळी मित्रमंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.












