कणकवली (प्रतिनिधी): कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी ) फेब्रु. २०२६ चा कला व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १००% लागला असून यातील कला शाखेमधून ७ व वाणिज्य शाखेमधून ३२ असे एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
वाणिज्य शाखा –
प्रथम क्रमांक – कु. रसिका नंदन गांवकर गुण – ५१२ शेकडा गुण – ८५.३३
द्वितीय क्रमांक – कु. प्राची महेश देसाई गुण – ५०९ शेकडा गुण – ८४.८३
तृतीय क्रमांक – कु. सारथी सुनील भोगले गुण – ४८३ शेकडा गुण – ८०.५०
कला शाखा –
प्रथम क्रमांक – कु. निधी विजय पालव गुण – ३५४ शेकडा गुण – ५९.००
द्वितीय क्रमांक – कु. मितीश विष्णू पाटकर गुण – ३३१ शेकडा गुण – ५५.१७
तृतीय क्रमांक – कु. प्रशांत प्रकाश कासले गुण – ३२८ शेकडा गुण – ५४.६७
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. सूर्यकांत राजाराम दळवी, कार्याध्यक्ष – श्री. विजय पांडुरंग सावंत, सरचिटणीस- श्री. जय मारुती दळवी, सल्लागार – श्री. प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – श्री. के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – श्री. नामदेव घाडीगावकर, सदस्य – श्री. रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या – सौ. शुभदा देसाई व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- श्री. अनिल सावंत मुख्याध्यापक – श्री. व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले.













